अभिष्टचिंतन - शशी मोगलाईकर
• अभिष्टचिंतन •
हिंदुह्रदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचारांनी तसेच महाराष्ट्रात मराठी माणसावर शासकीय व सार्वजनिक क्षेत्रातील नोकरीच्या ठिकाणी डावलला जात असलेला हक्क आणि मराठी माणसाची त्याच्या हक्काच्या महाराष्ट्रात होणारी सर्वच क्षेत्रातील पिछेहाट या गोष्टींनी मराठी माणसाला महाराष्ट्रात ताठ मानेने उभा करण्याच्या प्रमुख हेतुने सन 1966 साली शिवसेनेची स्थापना झाली. बाळासाहेबांच्या ज्वलंत विचारांनी प्रभावित होऊन धुळे शहरात शिवसेनेची प्रथम शाखा स्थापना करण्यात कै.श्री.सुधाकरआप्पा मोगलाईकर व कै.श्री.बापूदादा शार्दुल या निष्ठावान शिवसैनिकांनी पुढाकार घेतला होता. त्या काळात प्रस्थापित काँग्रेस कडून शिवसेनेची वाढ होऊच नये यासाठी आटोकाट प्रयत्न होत होते व यातून शिवसेनेत काम करणाऱ्या शिवसैनिकांचा अनन्वित छळ काँग्रेस सरकारकडून होत होता. परंतु वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दाखातर शिवसेनेसाठी सर्वस्व त्याग करणाऱ्या मोजक्याच शिवसैनिकांमध्ये ज्यांचे नांव आजही आदराने घेतले जाते ते धुळे जिल्हा माजी जिल्हाप्रमुख, शेतकरी सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, धुळे न.पालीकेचे माजी आरोग्य सभापती, 'पाक्षिक झुंज'चे संपादक कै.सुधाकरआप्पा मोगलाईकर यांचे कनिष्ठ सुपुत्र म्हणजे नगरसेवक श्री.शशी (संतोष) सुधाकर मोगलाईकर.
आपल्या पुज्य पिताश्रींचा सामाजिक कार्याचा आणि राजकीय कार्याचा वसा आणि वारसा समर्थपणे चालविणारा संतोष ऊर्फ शशी हा स्व.सुधाकर आप्पांचा लहान चिरंजीव आपल्या वडिलांप्रमाणेच धुळे नगरपालीकेचे नगरसेवक व आरोग्यसभापती होण्याचे भाग्य संतोषला लाभले. पुढे धुळे नगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर झाल्यानंतर स्व.सुधाकर आप्पांची स्नुषा व श्री.संतोषची पत्नी सौ.रेणुका हीला धुळे महानगरपालिकाची नगरसेविका म्हणुन निवडुण येण्याचा मान भारतीय जनता पक्षातर्फे मिळाला. भारतीय जनता पक्षाने महानगरपालिकेच्या गेल्या निवडणुकीत संतोषची प्रभाग क्र.16 मधुन जनतेतुन निवडुण येण्याची संपुर्ण क्षमता व सिध्दता असुनही पक्षश्रेष्ठींनी केलेल्या विनंतीला मान देऊन स्वतः निवडणूक लढवली नाही मात्र आपल्या प्रभाग 16 मधुन भाजपचे तिघे उमेदवार बहुमताने निवडुण आणण्याची किमया करुन दाखवली आणि त्यांच्या या असामान्य कर्तुत्वाची जाणिव ठेऊन स्विकृत नगरसेवक पदासाठी अत्यंत तिव्र स्पर्धा असुनही भाजपा णे त्यांना धुळे महानगरपालीकेत स्विकृत नगरसेवक होण्याची संधी दिली. तसेच भारतीय जनता पक्षाच्या धुळे जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सुद्धा पक्षश्रेष्ठींनी संतोषला दिलेली आहे तो ती जबाबदारी अत्यंत समर्थपणे निभावतांना दिसतो आहे. पक्षाने व सहका-यांनी स्विकृत नगरसेवक म्हणुन नियुक्त केल्यावर स्विकृत नगरसेवक कसा आणि काय विकास घडवुन आणू शकतो हे त्याने दुरदृष्टीने व अत्यंत कल्पकतेने केलेल्या प्रभागातील व परिसरातील विकास कामांचा आढावा घेतल्यास सहज लक्षात येते.
शिवराय मित्र मंडळाचा राजकीय कारकिर्दीशी निकटचा संबंध
संभाप्पा कॉलनी आणि परिसरातील आम्ही काही युवकांनी धार्मिक, सामाजिक स्वरुपाचे विधायक कार्य करण्याच्या हेतूने सन १९८९-९० च्या सुमारास 'श्री शिवराय मित्र मंडळ' या नावाने मंडळाची स्थापना केली. या मंडळाच्या माध्यमातून शिवजयंती, नवरात्रोत्सव, सार्वजनिक गणेशोत्सव आणि गेल्या तीस वर्षांपेक्षा अधिक काळापासून आजतागायत अविरत सुरू असलेला संभाप्पा कॉलनीतील शिवमंदिरावर होणार भव्य महाशिवरात्री उत्सव अतिशय भव्य प्रमाणात साजरा होत असतो. राजकारण विरहित हे उत्सव साजरे करतांना मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये परस्पर विश्वासाचे व स्नेहाचे दृढ नाते निर्माण झाले आहे. त्यावेळी भविष्यात आपल्या परिसरातील नागरिकांना रस्ते, गटारी, पथदिवे, उद्यान अशा स्वरूपाच्या काही मुलभूत सोयी व सुविधा उपलब्ध होणे गरजेचे वाटल्याने शिवराय मित्र मंडळाचा एखादा कार्यकर्ता धुळे नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून जाण्याच्या हेतूने मंडळाच्या मिटिंगमध्ये एकमताने निर्णय होऊन शशी ( संतोष) यांस निवडणूक लढविण्याचे ठरले पुढे मंडळाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी एकदलाने प्रचार करुन प्रसंगी पदरमोड करुन संतोषला प्रचंड मतांनी निवडून आणण्याची किमया शिवराय मित्र मंडळाने करुन दाखविली.
आमच्या शिवराय मित्र मंडळाचे अगदी स्थापनेपासूनच निरपेक्ष लोकसेवेचे ब्रिद आहे या ब्रिदाला अनुसरुन आम्ही आजवर जनहिताची अनेक कामे केलेली आहेत. सध्या आपल्या धुळे मिल परिसरात विकासाची अनेक कामे झालेली दिसतात परंतु आपल्या प्रभागातही अनेक विकास कामे झालेली आहेत अनेक भागात पुर्वी झालेली कामे दुरुस्ती वर आणि पुन:निर्माणावर आलेली आहेत. सद्यस्थितीत धुळे मनपावर प्रशासक राजवट असुन धुळे मनपाच्या आगामी निवडणुकीत भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी श्री.शशी यांस पुन्हा एकवार नगरसेवक होण्याची संधी द्यावी अशी शिवराय मंडळातर्फे विनंती.
आज आमच्या शिवराय मित्र मंडळ परिवारातील कर्तबगार सदस्य संतोषचा(शशी) याचा वाढदिवस.
वाढदिवसाच्या अनंत अनिरुद्ध शुभेच्छा....
संतोष तुला प्रभू श्रीराम कृपेने भावी आयुष्यात उदंड सुखसंपदा व आरोग्यसंपदा लाभो अशी सद्गुरु अनिरुद्ध चरणी प्रार्थना....
✍️ बिपीन वसंतराव अमृतकर (स्वतंत्र पत्रकार)
माजी अध्यक्ष - शिवराय मित्र मंडळ,धुळे
माजी सहसंपादक - दै.मुलूख मैदान,धुळे
संस्थापक - श्री बहुउद्देशीय युवक विकास मंडळ,धुळे
माजी कोअर कमिटी सदस्य - श्री.सद्गुरु पुण्यक्षेत्रम, निंब ता.अमळनेर जि.जळगांव








Comments
Post a Comment