Posts

राजेंद्र गर्दे - शुन्य ते शिखर गाठणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व

Image
  • पत्रकार मित्र राजेंद्र गर्दे यांचे अभिष्टचिंतन • अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा जिद्द , चिकाटी , खडतर मेहनत करण्याची तयारी व अनेकदा मानहानी, व्यक्तीगत अपमान याने खचुन न जाता दमदारपणे वाटचाल करण्याची धाडसी वृत्ती यामुळे सर्वसामान्य माणूस यशाचे शिखर कसे गाठू शकतो याचे चालते बोलते उदाहरण म्हणजे माझे गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत जिव्हाळ्याचे असलेले स्नेही धुळ्यातच नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात पत्रकारिता क्षेत्रात नावलौकिक व दबदबा निर्माण करणारे श्री.राजेंद्र उत्तम गर्दे. हाडाचा शिवसैनिक -  राजुभाऊंची ओळख आज सर्वत्र पत्रकार म्हणून असली तरी त्यांना खूप आधीपासून ओळखणाऱ्या सर्वांना त्यांची ओळख कट्टर हिंदुत्ववादी शिवसैनिक अशी आहे. स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे कट्टर समर्थक असलेले राजुभाऊ शिवसेनेच्या शाखांचे उद्घाटन, मोर्चे, आंदोलने, मान्यवर शिवसेना नेत्यांचे दौरे याप्रसंगी आवर्जून उपस्थित राहायचे व आपल्या निडर व धडपड्या व्यक्तीमत्वामुळे अनेकांच्या कौतुकाचा विषय व्हायचे. आमचे राजुभाऊ आज निःपक्ष पत्रकारीतेत असुन आजही वंदनीय बाळासाहेब ठाक...

श्री सिद्धी महागणपती - पाळधी

Image
श्री गणेशाय नमः   श्री सिद्धी महागणपती पाळधी - जळगांव      जळगांव जिल्ह्यातील पाळधी गावाबाहेर सुरत ते नागपूर महामार्गालगत तसेच महामार्ग पोलिस चौकीच्या मागील भव्य अशा मोकळ्या जागेत श्री सिद्धी वेंकटेश देवस्थानचे विश्वस्त श्रीकांत मणियार यांच्या वतीने श्री सिद्धी महागणपतीचं भव्य देवस्थान उभारण्यात आले आहे. धुळे शहरापासून सुमारे 80 कि.मी. अंतरावर असलेल्या तिर्थस्थळी  मला दि.19 फेब्रुवारी 2024 रोजी माझी पत्नी सौ.स्वाती व पुत्र सौरभ यांचेसह गणपती बाप्पाच्या दर्शनाचा लाभ झाला.      या आगळ्यावेगळ्या भव्य अशा मंदिरात देशात कुठेही नाही एवढ्या म्हणजे तब्बल 31 फूट उंचीच्या श्री गणेशाच्या मूर्तीची गुरुवार 9 फेब्रुवारी 2023 रोजी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती.               374 टन वजनाच्या एकाच अखंड काळ्या पाषाणात ही मूर्ती तयार करण्यात आली आहे. दक्षिण भारतात, ज्या ठिकाणी दगड मिळाला, त्याचठिकाणी मूर्तीकारांनी ती तयार केली असून तिला पूर्ण होण्यास दोन वर्षांचा काळ लागला. 100 टन एवढे या मूर...

सुधाकरआप्पा मोगलाईकर - ३३ वा स्मृतीदिन

Image
• ३२ वा स्मृतीदिन • दि.१८ मार्च २०२४ कै.आप्पासाहेब सुधाकर संभाप्पा मोगलाईकर, धुळे       उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हाप्रमुख कै.सुधाकरआप्पा मोगलाईकर यांचा आज ३३ वा स्मृतिदिन आहे. आजच्या त्यांच्या स्मृतिदिनाच्या दिवशी त्यांच्या अनेक पावन स्मृती व जीवनपट डोळ्यासमोर एखाद्या चित्रपटाप्रमाणे तरळून गेल्याशिवाय राहत नाही.   मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी मुंबई येथे प्रबोधनकार ठाकरे यांच्या सल्ल्याने व मार्गदर्शनाखाली वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हे ध्येय व सुत्र डोळ्यासमोर ठेवून १९ जून १९६६ साली शिवसेनेची स्थापना केली. बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत व महाराष्ट्रात मराठी माणसाची होणारी पिछेहाट बघून मराठी मनात ज्वलंत हिंदुत्ववादी विचार आणि लढाऊ बाणा रुजवुन मराठी माणसाला ताठ मानेने उभे करून अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची शिकवण दिली. संपूर्ण महाराष्ट्रातून युवकांचे लोंढेच्या लोंढे बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेत दाखल होत होते.     मुंबईत स्थापन झालेल्या या शिवसेना नामक संघटनेची मराठ...

अभिष्टचिंतन - शशी मोगलाईकर

Image
  •  अभिष्टचिंतन • श्री.संतोष (शशीशेखर) सुधाकर मोगलाईकर   हिंदुह्रदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचारांनी तसेच महाराष्ट्रात मराठी माणसावर शासकीय व सार्वजनिक क्षेत्रातील नोकरीच्या ठिकाणी डावलला जात असलेला हक्क आणि मराठी माणसाची त्याच्या हक्काच्या महाराष्ट्रात होणारी सर्वच क्षेत्रातील पिछेहाट या गोष्टींनी मराठी माणसाला महाराष्ट्रात ताठ मानेने उभा करण्याच्या प्रमुख हेतुने सन 1966 साली शिवसेनेची स्थापना झाली. बाळासाहेबांच्या ज्वलंत विचारांनी प्रभावित होऊन धुळे शहरात शिवसेनेची प्रथम शाखा स्थापना करण्यात कै.श्री.सुधाकरआप्पा मोगलाईकर व कै.श्री.बापूदादा शार्दुल या निष्ठावान शिवसैनिकांनी पुढाकार घेतला होता. त्या काळात प्रस्थापित काँग्रेस कडून शिवसेनेची वाढ होऊच नये यासाठी आटोकाट प्रयत्न होत होते व यातून शिवसेनेत काम करणाऱ्या शिवसैनिकांचा अनन्वित छळ काँग्रेस सरकारकडून होत होता. परंतु वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दाखातर शिवसेनेसाठी सर्वस्व त्याग करणाऱ्या मोजक्याच शिवसैनिकांमध्ये ज्यांचे नांव आजही आदराने घेतले जाते ते धुळे जिल्हा माजी जिल्हाप्रमुख, शे...

संजय बगदे - यारो का यार दुश्मनो का दोस्त

Image
  • अभिष्टचिंतन • श्री.संजय शिवराम बगदे (जन्मदिन - 9 मार्च)  धुळे मिल परिसरातच नव्हे तर धुळे महानगरात अत्यंत जिंदादील व्यक्तीमत्व म्हणून किर्ती लाभलेले माझे किशोर वयापासून क्रिकेटच्या खेळामुळे झालेले व आजतागायत दृढ मित्र असलेले श्री.संजय शिवराम बगदे ज्यांची ओळख सामाजिक व राजकीय क्षेत्रात संजूआबा अशी आहे.  निष्ठावंत कार्यकर्ता - संजुभाऊची राजकारणातील प्रामुख्याने ओळख कार्यसम्राट माजी आमदार श्री.अनिलआण्णा गोटे यांचा अत्यंत निकटचा व निष्ठावंत सहकारी व कार्यकर्ता अशी आहे.  आण्णासाहेब गोटे कोणत्याही पक्षात असु द्या परंतु संजुभाऊला त्याने आजवर काहीही फरक पडलेला नाही. आण्णासाहेब गोटे यांनाच एक स्वतंत्र पक्ष मानून सातत्याने त्यांची साथसंगत करणारा संजुभाऊ सारखा कार्यकर्ता व्यक्तीनिष्ठा कशी असावी याचा वस्तुपाठ समस्त कार्यकर्त्यांसमोर ठेवतात.परंतु गेल्या वर्षी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी राजकीय पक्षांशी फारकत घेतल्याचे दिसते आहे.त्यामुळे ते राजकीय बाबींवर समर्थनार्थ व विरोधात प्रतिक्रिया देण्याचे टाळतात असे लक्षात येते. मिस्किल स्वभावाचे जिंदादील व्यक्तीमत्व - संजुभाऊ...