Posts

Showing posts from April, 2024

श्री सिद्धी महागणपती - पाळधी

Image
श्री गणेशाय नमः   श्री सिद्धी महागणपती पाळधी - जळगांव      जळगांव जिल्ह्यातील पाळधी गावाबाहेर सुरत ते नागपूर महामार्गालगत तसेच महामार्ग पोलिस चौकीच्या मागील भव्य अशा मोकळ्या जागेत श्री सिद्धी वेंकटेश देवस्थानचे विश्वस्त श्रीकांत मणियार यांच्या वतीने श्री सिद्धी महागणपतीचं भव्य देवस्थान उभारण्यात आले आहे. धुळे शहरापासून सुमारे 80 कि.मी. अंतरावर असलेल्या तिर्थस्थळी  मला दि.19 फेब्रुवारी 2024 रोजी माझी पत्नी सौ.स्वाती व पुत्र सौरभ यांचेसह गणपती बाप्पाच्या दर्शनाचा लाभ झाला.      या आगळ्यावेगळ्या भव्य अशा मंदिरात देशात कुठेही नाही एवढ्या म्हणजे तब्बल 31 फूट उंचीच्या श्री गणेशाच्या मूर्तीची गुरुवार 9 फेब्रुवारी 2023 रोजी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती.               374 टन वजनाच्या एकाच अखंड काळ्या पाषाणात ही मूर्ती तयार करण्यात आली आहे. दक्षिण भारतात, ज्या ठिकाणी दगड मिळाला, त्याचठिकाणी मूर्तीकारांनी ती तयार केली असून तिला पूर्ण होण्यास दोन वर्षांचा काळ लागला. 100 टन एवढे या मूर...