सुधाकरआप्पा मोगलाईकर - ३३ वा स्मृतीदिन
• ३२ वा स्मृतीदिन • दि.१८ मार्च २०२४ कै.आप्पासाहेब सुधाकर संभाप्पा मोगलाईकर, धुळे उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हाप्रमुख कै.सुधाकरआप्पा मोगलाईकर यांचा आज ३३ वा स्मृतिदिन आहे. आजच्या त्यांच्या स्मृतिदिनाच्या दिवशी त्यांच्या अनेक पावन स्मृती व जीवनपट डोळ्यासमोर एखाद्या चित्रपटाप्रमाणे तरळून गेल्याशिवाय राहत नाही. मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी मुंबई येथे प्रबोधनकार ठाकरे यांच्या सल्ल्याने व मार्गदर्शनाखाली वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हे ध्येय व सुत्र डोळ्यासमोर ठेवून १९ जून १९६६ साली शिवसेनेची स्थापना केली. बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत व महाराष्ट्रात मराठी माणसाची होणारी पिछेहाट बघून मराठी मनात ज्वलंत हिंदुत्ववादी विचार आणि लढाऊ बाणा रुजवुन मराठी माणसाला ताठ मानेने उभे करून अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची शिकवण दिली. संपूर्ण महाराष्ट्रातून युवकांचे लोंढेच्या लोंढे बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेत दाखल होत होते. मुंबईत स्थापन झालेल्या या शिवसेना नामक संघटनेची मराठ...