संजय बगदे - यारो का यार दुश्मनो का दोस्त

 

• अभिष्टचिंतन •
श्री.संजय शिवराम बगदे (जन्मदिन - 9 मार्च) 
धुळे मिल परिसरातच नव्हे तर धुळे महानगरात अत्यंत जिंदादील व्यक्तीमत्व म्हणून किर्ती लाभलेले माझे किशोर वयापासून क्रिकेटच्या खेळामुळे झालेले व आजतागायत दृढ मित्र असलेले श्री.संजय शिवराम बगदे ज्यांची ओळख सामाजिक व राजकीय क्षेत्रात संजूआबा अशी आहे. 
निष्ठावंत कार्यकर्ता - संजुभाऊची राजकारणातील प्रामुख्याने ओळख कार्यसम्राट माजी आमदार श्री.अनिलआण्णा गोटे यांचा अत्यंत निकटचा व निष्ठावंत सहकारी व कार्यकर्ता अशी आहे.  आण्णासाहेब गोटे कोणत्याही पक्षात असु द्या परंतु संजुभाऊला त्याने आजवर काहीही फरक पडलेला नाही. आण्णासाहेब गोटे यांनाच एक स्वतंत्र पक्ष मानून सातत्याने त्यांची साथसंगत करणारा संजुभाऊ सारखा कार्यकर्ता व्यक्तीनिष्ठा कशी असावी याचा वस्तुपाठ समस्त कार्यकर्त्यांसमोर ठेवतात.परंतु गेल्या वर्षी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी राजकीय पक्षांशी फारकत घेतल्याचे दिसते आहे.त्यामुळे ते राजकीय बाबींवर समर्थनार्थ व विरोधात प्रतिक्रिया देण्याचे टाळतात असे लक्षात येते.

मिस्किल स्वभावाचे जिंदादील व्यक्तीमत्व - संजुभाऊचा स्वभाव एकूणच मिस्किल आणि गंमतीदार असल्याचा प्रत्यय त्यांच्या निकटच्या आणि सोशल मीडियावर असंख्य फेसबुक मित्रांना चांगलाच परिचीत आहे. फेसबुकवर संजुभाऊ करीत असलेल्या सामाजिक व राजकीय स्थितीवर भाष्य करीत असलेल्या पोस्ट सर्व मित्रांना चर्चेत सहभागी होण्यास व प्रतिक्रिया देण्यास भाग पाडणाऱ्या असत सर्व मित्र त्यांच्या विविध विषयांवरील प्रतिक्रिया वाचण्यास मिळाव्यात यासाठी उत्सुक असतात.

• दुश्मनो का दोस्त - क्रिकेट, खो-खो, कब्बडी या खेळात पारंगत असलेला संजुभाऊ अत्यंत खिलाडूवृत्तीचा असुन सर्व व्यवहारांकडे सकारात्मक दृष्टीने बघणारा असुन खेळातला पराभव असो की राजकारणातला तो हार अथवा पराभव सहज पचविण्याची अफाट क्षमता संजुभाऊच्या अंगी आहे. त्यामुळे तो विरोधकांशी सुद्धा कटुता न ठेवता मित्रत्वाचे नाते प्रस्थापित करतो.
• यारो का यार - आपल्या मराठा समाजातील बांधवांची आरक्षणाच्या अभावी होणारी ससेहोलपट बघुन व्यथित होणारा संजुभाऊ 'एक मराठा लाख मराठा' अशी घोषणा देऊन मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी होणाऱ्या प्रत्येक आंदोलनात अगदी अग्रभागी दिसुन येत असला तरी त्याने  मित्रांशी मैत्री निभावताना मैत्रीच्या आड धर्म,जात, पंथ यांच्या कुठल्याच भिंती आडव्या येऊ दिल्या नाहीत. त्यामुळे संजुभाऊचा सर्व जाती धर्मात मोठा मित्र परिवार आहे. 


कृषीवल निसर्गप्रेमी - आपली नोकरी व उद्योग सांभाळून निसर्गप्रेमी व शेती व्यवसायात रस असल्याने वेळात वेळ काढून शेतीच्या कामांमध्ये सुद्धा रमतो त्याचे घरासमोरील मोकळ्या जागेत शेवग्याच्या झाडांची जोपासना केली असुन या झाडाच्या शेंगांची काळ्या मसाल्याची भाजी चमचमीत भाजीचे भरले ताट फेसबुकद्वारे फोटोतून दाखवून समस्त मित्रांच्या तोंडाला पाणी आणतो त्यांचे शेवग्याच्या शेंगांच्या गुणवर्णनाचे आख्यान आणि भाजीचे रसभरीत वर्णन वाचून व ऐकून काही मित्रांनी आमच्या संजुभाऊला 'शेवगासम्राट' अशी पदवी बहाल केली आहे. 


👉 प्रिय मित्र संजुभाऊ आज शासकीय सेवेत जो सेवेतून निवृत्तीचा 58 वर्षपूर्तीचा जो उंबरठा असतो तो पार करतोय. 
   भावी आयुष्यात कौटुंबिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील ध्येयांच्या पुर्तेतेसाठी  संजुभाऊला उदंड यश लाभो व यासाठी उत्तम आरोग्यसंपदा लाभो अशी प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना! 
मित्र संजुभाऊला वाढदिवसाच्या
अनंत अनिरुद्ध शुभेच्छा ! 💐🎂
✍️ बिपीन वसंतराव अमृतकर (पत्रकार ) 
       माजी सहसंपादक - दै.मुलूख मैदान 










Comments

Popular posts from this blog

राजेंद्र गर्दे - शुन्य ते शिखर गाठणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व

सुधाकरआप्पा मोगलाईकर - ३३ वा स्मृतीदिन

श्री सिद्धी महागणपती - पाळधी